Karuna Sharma Video : करूणा शर्मांचा आक्रमक पवित्रा, धनंजय मुंडेंविरोधात उपोषणाला बसणार, तारीख अन् ठिकाणासह सारंकाही सांगितलं
मंत्री धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा दावाही करूणा शर्मा यांनी केली. मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात करूणा शर्मा या आक्रमक झाल्या असून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन त्यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी झाली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली.
अधिवेशनापूर्वी करूणा शर्मा उपोषणाला बसणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात करूणा शर्मा उपोषणाला बसणार आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा दावाही करूणा शर्मा यांनी केली. मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात करूणा शर्मा या आक्रमक झाल्या असून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन त्यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी झाली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली. इतके घोटाळे करून सुद्धा माणूस मंत्रिमंडळात राहतो कसा? त्याला कोण वाचवतोय? असा सवाल करूणा शर्मांनी केला आहे. पुढे त्या असंही म्हणाल्या, इतके आरोप झाल्यानंतर त्याचे पुरावे देऊन सुद्धा त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही. त्यामुळे मला न्याय मिळावा यासाठी ३ मार्चपासून आझाद मैदानात उपोषणाला बसणार असल्याचा निर्धार करूणा शर्मा यांनी व्यक्त केला. इतकंच नाहीतर भविष्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळीमध्ये निवडणूक लढवणार असल्याचेही करूणा शर्मांनी सांगितलं. तर गेल्यावेळी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती देत करूणा शर्मा म्हणाल्या, यावेळी हा अर्ज बाद होणार नाही कारण कोर्टाने धनंजय मुंडेंच्या पत्नीचा दर्जा दिलेला आहे आणि म्हणूनच मोठ्या संख्येने निवडून येईल, असा विश्वासही करूणा शर्मा यांनी व्यक्त केला आहे.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

