Karuna Sharma : त्यांची पक्षातून हकालपट्टी होणार आहे, म्हणून..; मुंडेंच्या ध्यानसाधनेवर करुणा शर्मांची प्रतिक्रिया
Karuna Sharma News : धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसांपासून विपश्यना केंद्रात गेलेले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर आता करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे यांनी ध्यानसाधनेचा मार्ग स्वीकारला ही चांगली गोष्ट असल्याचं करुणा मुंडे यांनी म्हंटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकरच धनंजय मुंडे यांची पक्षातून हकालपट्टी करणार आहेत, असा मोठा दावा देखील यावेळी करुणा शर्मा यांनी केला आहे.
माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे हे मन:शांतीवर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. ते गेल्या आठ दिवसांपासून इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात ध्यानधारणा करत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे. यावर आता करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अगोदरच त्यांनी ध्यान धारणेचा मार्ग स्वीकारलेला आहे. चांगली गोष्ट आहे. कारण आता सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं मंत्रिपद गेलेले आहे. आमदारकी सुद्धा जाणार आहे. तर पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळालेलं आहे, त्यामुळे त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे, असं देखील करुणा मुंडे यांनी म्हंटलं आहे. पंकज मुंडे यांना परळी काबिज करायची आहे, असं देखील करुणा मुंडे यांनी म्हंटलं आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

