Karuna Sharma : मुंडेंना शासकीय बंगला सोडवेना… करूणा शर्मा म्हणाल्या, जिथं 8 वर्ष राहिलात तिथं माझ्या फ्लॅटवर यावं अन् दुसऱ्या बायकोला…
'धनंजय मुंडे पुन्हा कधीही मंत्री होणार नाहीत, त्यांना त्यांचे आमदारपदही गमवावे लागणार आहे. न्यायालयाने धनंजय मुंडे यांना १०,००० रुपयांचा दंडही लागू केले आहे.', असे करूणा शर्मा म्हणाल्यात.
मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर साडेचार महिने लोटले असले तरी अद्याप धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगला सोडलेला नाही. तर दुसरीकडे महायुती सरकारमध्ये सहा महिन्यांनी छगन भुजबळांना मंत्रीपदाचा लालदिवा मिळाला मात्र सरकारी बंगल्याच्या अजूनही ते प्रतीक्षेत आहे. कारण सरकारनं सातपुडा बंगला मंत्री भुजबळांना दिला असता तरी तिथला ताबा अद्याप माजी मंत्री धनंजय मुंडेंनी सोडलेला नाही. त्यामुळे भुजबळ मंत्री पद मिळाल्यापासून त्यांच्या सांताक्रूजमधल्या खाजगी घरात राहताहेत. आपल्याला अद्याप शासकीय बंगला मिळालेला नाही हे सांगताना भुजबळांच्या चेहऱ्यावर नाराजी पाहायला मिळाली होती.
दरम्यान, मुंबईतील बंगला न सोडण्यामागे मुंडेंनी दोन कारणं दिलीत. एक म्हणजे धनंजय मुंडेंचं आजारपण आणि त्यांच्या मुलीच्या शाळेचाही प्रश्न… त्यामुळे त्यांनी बंगला सोडण्यासाठी मुदतवाढ मागितल्याचे म्हटले होते. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आतापर्यंत त्यांना तब्बल ४२ लाख रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती आहे. दरम्यान, यावर करूणा शर्मा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. करुणा शर्मा म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांचे मुंबईत तीन-चार घरे आहेत. पवई, मलबार हिल आणि सांताक्रूझमध्ये आमचे देखील घर आहे. जर धनंजय मुंडेंना घर नसेल तर त्यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबत माझ्या घरी यावे.
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप

