Kashif Khan | नवाब मलिकांनी आरोप केलेला दाढीवाला काशिफ खान समोर

माझा कोणत्याही पोर्न रॅकेटशी संबंध नाही, असं फॅशन टीव्ही इंडियाचे एमडी काशिफ खान यांनी म्हटलं आहे. काशिफ खान यांनी मीडियाशी संवाद साधताना नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांचा इन्कार केला आहे.

मुंबई: क्रुझवरील पार्टीचा संयोजक काशिफ खान हा ड्रग्ज रॅकेट आणि पोर्न रॅकेट चालवत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. त्याला काशिफ खान यांनी उत्तर दिलं आहे. माझा कोणत्याही पोर्न रॅकेटशी संबंध नाही, असं फॅशन टीव्ही इंडियाचे एमडी काशिफ खान यांनी म्हटलं आहे. काशिफ खान यांनी मीडियाशी संवाद साधताना नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांचा इन्कार केला आहे. नवाब मलिक यांचे आरोप ऐकून मला धक्का बसला आणि आश्चर्यही वाटलं. आपल्यावरील आरोप निराधार आहेत, असं खान यांनी सांगितलं. फॅशन टीव्ही इंडियाने क्रुझवर आयोजित केलेल्या एका इव्हेंटचा मी प्रायोजक होतो. मी स्वत: टिकीट काढून तिथे गेलो होतो. मी माझ्या क्रेडिट कार्डवरूनच खाण्यापिण्याचं आणि रुमचं भाडं भरलं. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असं त्यांनी सांगितलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI