Pahalgam Mini Switzerland : पहलगामचा हाच सेल्फी पॉइंट ज्याची पर्यटकांना भुरळ, ‘मिनी स्वित्झर्लंड’ ओळख अन् तिथंच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या
बैसरन व्हॅली "मिनी-स्वित्झर्लंड" म्हणून ओळखली जाते, देश आणि जगभरातून मोठ्या संख्येने लोक येथे भेट देण्यासाठी येतात. सौंदर्याच्या बाबतीत हे ठिकाण प्रसिद्ध पर्यटनस्थळांनाही अपयशी ठरवते. मात्र याच ठिकाणी झालेली घटना पर्यटक कधीही विसरू शकणार नाही
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे असे अनेक पर्यटन स्थळं आहे जे पर्यटकांना आकर्षित करतात. त्यातील एक म्हणजे पहलगाम येथील सेल्फी पॉईंट… पहलगाम येथील हा सेल्फी पॉईंट असा आहे की, ज्यावरून संपूर्ण टॉप व्ह्यू तुम्हाला दिसतो. याच ठिकाणावरून बैसरन व्हॅली दिसते. बैसरन व्हॅलीचं संपूर्ण दृश्य पाहिलं तर लक्षात येते की का या ठिकाणाची पर्यटकांना भुरळ असते आणि या जागेला मिनी स्वित्झर्लंड का म्हणतात.. दुपारच्या वेळेला देखील या हिरव्या गर्द घनदाट जंगलात जिथं नजर जाईल तिथं फक्त आणि फक्त बर्फ आणि बर्फच तुम्हाला पाहिला मिळेल. मात्र याच बैसरन व्हॅली ठिकाणी काही दहशतवादी अचानक आले आणि त्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळ्या झाडल्या.
काश्मीरमधील पहलगाममधील घनदाट जंगलांनी वेढलेल्या मनमोहक बैसरन व्हॅलीचा दिवस मंगळवारी (22 एप्रिल 2025) सामान्य दिवसाप्रमाणे उगवला. या परिसरात 1,000 ते 1,500 पर्यटक उपस्थित होते, त्यांनी सुंदर निसर्गाचा आनंद लुटला. जसजसा दिवस मावळत गेला तसतशी पर्यटकांची संख्या वाढत गेली, मात्र दुपारी येथेच दहशतवादी हल्ला झाला आणि हिरवीगार बैसरन व्हॅली पर्यटकांच्या रक्ताने भिजली.

..अन् दुर्घटनेचा LIVE व्हिडिओ बनला, शूट करणाऱ्याच्या मित्रानं सांगितलं

इस्त्रायल-इराण संघर्ष पेटला, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?

बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर..

सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय
