Nimisha Priya : येमेनमध्ये भारतीय नर्सच्या निमिषा प्रियाला होणार फाशी, उरला फक्त एकच दिवस
भारतीय नर्स निमिषाला फाशीच्या शिक्षेपासून वाचवण्यासाठी हत्या झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला ‘ब्लड मनी’ देण्याच्या पर्यायावर विचार व्हावा, अशी मागणी सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेत करण्यात आली आहे. त्यावर काहीही करू शकत नसल्याचे वकिलांनी म्हटलंय.
केरळच्या पलक्कड जिल्ह्याची निवासी असलेली नर्स निमिषा प्रियाला हत्येप्रकरणी येमेनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही फाशी १६ जुलै रोजी देण्यात येणार आहे. दरम्यान, येमेनच्या कायद्यात ब्लड मनीची तरतूद आहे. म्हणजे आरोपी मृतकाच्या कुटुंबाला पैसा देऊन स्वत:ला वाचवू शकतो. निमिषा प्रियाच्या कुटुंबाने तिला वाचवण्यासाठी पिडीत व्यक्ती तलाल अब्दो महदीच्या कुटुंबाला ब्लड मनी म्हणून ८ कोटी ६ लाख रूपये देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
येमेनमध्ये शरिया कायद्यातंर्गत ही तरतूद असून आरोपीला माफ करण्याच्या बदल्यात ब्लड मनी देण्याची तरतूद आहे. मात्र हत्या झालेल्या व्यक्तीच्या परिवाराने हे पैसे घेण्यास नकार दिला तर भारत सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र येमेनची संवेदनशील लक्षात घेता सरकारने फारसं काही करू शकत नाही, असं बाजू मांडणाऱ्या वकिलांनी सांगितलंय. २०१७ साली येमेनी बिझनेस पार्टनर तलाल अब्दो महदीच्या कथित हत्या प्रकरणात निमिषा प्रियाला ही फाशीची शिक्षा झाली आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

