Kirit Somaiya यांनी राऊतांविरोधात कुटुंबाची बदनामी केल्याच्या आरोपांवरुन 100 कोटींचा दावा ठोकला

किरीट सोमय्यंनी संजय राऊतांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. कुटुंबाची बदनामी केल्याच्या आरोपावरून 100 कोटींचा दावा ठोकण्यात आला.

सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

May 23, 2022 | 3:22 PM

शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राऊत यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टात आज मेधा किरीट सोमय्यांनी शंभर कोटींचा दिवाणी मानहानीचा दावा दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा वरिष्ठ नेते किरीट सोमय्या आणि नगरसेवक नील सोमय्या हे देखील उपस्थित होते. यासंदर्भात किरीट सोमय्या म्हणाले की संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते आहेत. त्यांनी माफी कशी मागावी याची तयारी सुरू करावी. त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी.पुढे किरीट सोमय्या म्हणाले की माफियाराज सुरू आहे ,दहशत माजवली जात आहे. माफिया राजला धडा शिकवण्यासाठी 100 कोटींची मानहानी याचिका मेधा सोमय्या यांनी आज मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे . त्यावर जून महिन्यात सुनावणी अपेक्षित आहे. मात्र कोर्टाने ठरवावं की संजय राऊत यांना किती आर्थिक दंड लावायचा आणि जो काही दंड असेल तो पैसे धर्मादाय संस्थेला देण्यात यावा. या दरम्यान संजय राऊत यांच्याकडून मेधा सोमय्यांवर शंभर कोटींच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र किरीट सोमय्या याचं म्हणणे आहे की, या संदर्भात एकही पुरावा संजय राऊत यांनी दिलेला नाही आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. तरीही उत्तर देण्यात आलेलं नाही. म्हणून त्यांच्या विरोधात आम्ही पहिले शिवडी कोर्टात फौजदारी अब्रु नुकसानीचा दावा आणि आता मुंबई हायकोर्टात मानहानीची याचिका दाखल केली आहे .

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें