“जाहिरातीमुळे भाजप, शिवसेनेच गैरसमज”, शिवसेनेच्या समर्थक आमदाराची प्रतिक्रिया
गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या जाहिरातीमुळे राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजप-शिवसेनेत नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. भाजप नेते खुली नाराजी व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे समर्थक आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूर : गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या जाहिरातीमुळे राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजप-शिवसेनेत नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. भाजप नेते खुली नाराजी व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे समर्थक आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जाहिरांतींमुळे राज्यात एक वातावरण निर्माण झालं आहे. वातावरण गैरसमजातून निर्माण झाल्याने भाजप आणि शिवसेनेत तणाव निर्माण झाला आहे.हा तणाव कमी व्हावा म्हणून मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार. आमच्या पक्षात संजय राऊत सारखा कोण आहे याचा शोध घ्यावा लागेल. स्थानिक पातळीवर राजकारण असतं, पण आम्हाला भाजपच्या नेत्यांकडून त्रास नाही”, असं जोरगेवार म्हणाले.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश

