Special Report | उत्तर प्रदेशात धर्मांतरणाचं बीड कनेक्शन!

उत्तर प्रदेशातील धर्मांतर प्रकरणांमध्ये बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्याच्या शिरसाळा गावातील इरफान शेख नावाच्या तरुणाला अटक झाली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे.

Special Report | उत्तर प्रदेशात धर्मांतरणाचं बीड कनेक्शन!
| Updated on: Jun 29, 2021 | 9:07 PM

बीड : उत्तर प्रदेशातील धर्मांतर प्रकरणांमध्ये बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्याच्या शिरसाळा गावातील इरफान शेख नावाच्या तरुणाला अटक झाली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे. धर्मांतरासारख्या गंभीर प्रकरणांमध्ये मराठवाड्यातला तरुण सापडल्यामुळे सध्या मराठवाड्यात पुन्हा एकदा दहशतवादी चळवळ पाय पसरते आहे की काय अशी शंका उपस्थित होत आहे (Know everything about Beed connection with UP religious Conversion)

बीडच्या तरुणावर धर्मांतराच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप

इरफान शेख हा तरुण जो मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातील परळी सारख्या दुर्गम तालुक्यातल्या शिरसाळा या छोट्याशा गावातील रहिवासी आहे. या तरुणाचं शिक्षण सुद्धा शिरसाळा गावातल्या प्राथमिक शाळेत झालं. यानंतर नोकरीच्या निमित्ताने हा तरुण दिल्लीत गेला. त्या ठिकाणी सध्या तो प्रोफेसर म्हणून काम करतोय. मात्र, प्रोफेसर म्हणून काम करत असणारा हा तरुण धर्मांतराच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप उत्तर प्रदेश पोलिसांनी केलाय. तसेच या प्रकरणात त्याला पोलिसांकडून अटकही झाली. यामुळे सध्या या तरुणाच्या कार्य पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

उत्तर भारतातील कथित धर्मांतर प्रकरण गंभीर आहे. उत्तर प्रदेश मधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जवळपास 1 हजार लोकांना धर्मांतरित करण्यात आल्याचा आरोप होतोय. लोकांचं धर्मांतर करत असताना वेगळी थेअरी अवलंबण्यात आल्याचीही चर्चा आहे.

इरफानच्या कुटुंबाने आरोप फेटाळले

इरफानला या प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याच्यावर करण्यात आलेले आरोप त्याच्या कुटुंबाने फेटाळून लावले आहेत. इरफान असं असं करू शकत नाही असं त्याच्या कुटुंबाचा म्हणणं आहे.

कुटुंबीयांचा काहीही दावा असला तरी उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपासामध्ये काय समोर येतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पोलीस आरोपपत्रात इरफानवर कुठले कुठले आरोप दाखल करतात आणि त्यासाठी कुठले कुठले पुरावे देतात हेही या प्रकरणात महत्त्वाचं आहे. यातूनच इरफानचा या रॅकेटमधील सहभाग स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा :

उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतराचे बीड कनेक्शन, परळीच्या तरुणाला अटक

(Know everything about Beed connection with UP religious Conversion)

Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.