Mock Drills : रत्नागिरीच्या खोल समुद्रात होणार मॉक ड्रिल, सागरी सुरक्षेच्या दृष्टीने कोकण किनारपट्टीवर गस्त; बघा कशी सुरुये तयारी?
केंद्र सरकारने उद्या ७ मे रोजी देशव्यापी मॉक ड्रिल करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिलेत. देशावर युद्धाचं सावट असताना भारताची तयारी सुरू झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील १६ ठिकाणी मॉक ड्रिल करण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उद्या होणाऱ्या मॉक ड्रिलची तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. देशाच्या सागरी सुरक्षेच्या दृष्टीने कोकण किनारपट्टीवर देखील मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने रत्नागिरी हा जिल्हा देखील महत्त्वाचा मानला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या समुद्रात सागरी सुरक्षेच्या दृष्टीने कोस्ट गार्डच्या यंत्रणेकडून समुद्रात गस्त घातली जात आहे. या गस्ती दरम्यान कोस्ट गार्डच्या यंत्रणेकडून समुद्रातील आणि समुद्र किनाऱ्यावरील बोटिंची तपासणी केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 16 लँडिंग पॉईंट्स आहेत. 16 लँडिंग पॉईंट्ससह मिरकरवाडा बंदर आणि अल्ट्राटेक जेट्टी या ठिकाणीही मॉक ड्रिल केले जाणार आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील मॉक ड्रिल होणार आहे. कोकणाला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असून सागरी सुरक्षेच्या दृष्टीने कोकणात होणारी मॉक ड्रिल देखील महत्त्वाची मानली जात आहे.
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका

