कोल्हापुरात जंगी मिरवणूक, ढोल ताशा पथकासह 125 कार्यकर्त्यांवर गुन्हा

गणपती आगमन मिरवणूक काढल्याप्रकरणी कोल्हापुरातील शिवाजी चौक तरुण मंडळाच्या 125 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलिसांनी ही कारवाई केली. मंडळाचे संस्थापक माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.

कोल्हापूर : गणपती आगमन मिरवणूक काढल्याप्रकरणी कोल्हापुरातील शिवाजी चौक तरुण मंडळाच्या 125 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलिसांनी ही कारवाई केली. मंडळाचे संस्थापक माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीला बंदी असताना सवाद्य मिरवणूक काढल्याने मंडळावर गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईत मंडळाच्या कार्यकर्त्यांसह ढोल-ताशा पथकातील कलाकारांचाही समावेश आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI