महाडिक गटाला मोठा धक्का, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे 1,272 सभासद अपात्र
VIDEO | प्रादेशिक साखर सहसंचालकांनी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासंदर्भात मोठा निर्णय, कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे 1 हजार 272 सभासद अपात्र ठरले आहे
कोल्हापूर, ८ सप्टेंबर २०२३ | कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे 1 हजार 272 सभासद अपात्र ठरल्याचे समोर आले आहे. प्रादेशिक साखर सहसंचालकांचा छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासंदर्भात हा मोठा निर्णय असल्याचे म्हटले जात आहे. या निकालामुळे महाडिक गटाला मोठा धक्का बसला आहे. तर अपात्र सभासदांमध्ये महाडिक कुटुंबातील दहा सदस्यांचा समावेश असल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, काही महिन्यापूर्वी झालेल्या कारखाना निवडणुकीत सत्ताधारी महाडिक गटाने एक हत्ती सत्ता मिळवत सतेज पाटील गटाचा पराभव केला होता. मात्र नुकतीच झालेली राजाराम कारखान्याची निवडणूक बेकायदेशीर ठरवत फेर निवडणूक घेण्याकरता आमदार सतेज पाटील यांनी मागणी केली आहे. त्यामुळे आता राजाराम कारखान्याची निवडणूक पुन्हा होणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा

