Kolhapuri Chappal : कोल्हापुरी पायताणाची इटलीच्या कंपनीकडून चोरी, लक्झरी फॅशन ब्रँड विकतंय लाखात कोल्हापुरी?
इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड प्राडाच्या नवीन कलेक्शनवरून सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे. प्राडाने नुकतेच मिलानमध्ये त्यांचे Men's Spring/Summer 2026 कलेक्शन सादर केले. मॉडेल्सच्या पायात दिसणारे सँडल अगदी भारतातील प्रसिद्ध 'कोल्हापुरी चप्पल' सारखे दिसत होते.
एखाद्यानं कोल्हापुरी पायताण खाल्ल्याची बातमी तुम्ही आतापर्यंत ऐकली असेल. मात्र यावेळी चक्क कोल्हापुरी पायताणाचीच चोरी झाल्याचे समोर आले आहे. सातासमुद्रापारच्या एका फॅशन शोमध्ये Prada नावाच्या एका जगविख्यात कंपनीवर कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड चोरीचा आरोप होतोय. कोल्हापुरी चप्पल आपल्याकडे ८०० ते १००० पर्यंत मिळते. मात्र धक्कादायक म्हणजे त्याच कोल्हापुरी चप्पलची हुबेहूब कॉपी करून Prada ही इटलीची कंपनी जगभरात आपली कोल्हापुरी चप्पल १ लाख ५ हजारांना विकत असल्याचेही दावे होत आहेत. अशातच Prada कंपनीने एक फॅशन शो आयोजित केला होता. त्याच वेळी एकाहून अधिकांनी कोल्हापुरी चप्पलेच्या ब्रँडिंगसाठी वापर केल्याचे पाहायला मिळाले.
Published on: Jun 25, 2025 07:01 PM
Latest Videos
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!

