Kokan Railway Update : कोकण रेल्वे 14-15 तासांपासून ठप्प, प्रवासी अडकले; कधी होणार रेल्वे वाहतूक सुरू?
मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. कोकण रेल्वे तब्बल १४ ते १५ तासांपासून ठप्प आहे. दिवाणखवटी बोगद्याजवळ ट्रॅकवर दरड बाजूला करण्याचे काम सुरु आहे. तर कोकण रेल्वे अजूनही सुरु होण्यासाठी काही तास लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
कोकणात गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. कोकण रेल्वे तब्बल १४ ते १५ तासांपासून ठप्प आहे. दिवाणखवटी बोगद्याजवळ ट्रॅकवर दरड बाजूला करण्याचे काम सुरु आहे. तर कोकण रेल्वे अजूनही सुरु होण्यासाठी काही तास लागणार असल्याचे सांगितले जात आहे. तर पावसामुळे अजूनही ट्रॅकवर माती आणि चिखल असल्याने रेल्वे वाहतूक ठप्प आहे. जवळपास १०० कामगारांच्या मतदीने ट्रॅवरवरील माती हटवण्याचे काम सुरु आहे. तर कोकणातील अतिवृष्टीमुळे आणि खेड येथे कोसळलेल्या दरडीमुळे रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रवाशी खोळंबले आहेत. याची माहिती मिळताच राज्याचे उद्योग मंत्री आणि रायगड-रत्नागिरीचे पालक मंत्री उदय सामंत यांनी या प्रवाशांची भेट घेऊन विचारपूस केली. या प्रवाशांच्या जेवणाची तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही उदय सामंत यांनी केली. यानंतर खोळंबलेल्या प्रवाशांनी मंत्री सामंत यांचे आभार मानले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

