AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nawab Malik | अधिवेशनात आणखी एका भाजप नेत्याचं बिंग फोडणार- नवाब मलिक

Nawab Malik | अधिवेशनात आणखी एका भाजप नेत्याचं बिंग फोडणार- नवाब मलिक

| Edited By: Akshay Adhav | Updated on: Oct 31, 2021 | 10:46 AM
Share

केपी गोसावी आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्याच्या बायकोची एका खाजगी कंपनीत पार्टनरशीप आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केलाय. तसंच येत्या विधानसभा अधिवेशनात तो नेता कोण?, हे नावंही जाहीर करेन, असं म्हणत मलिकांनी फटाक्यांची माळ सुरुच ठेवली आहे.

गेले तीन आठवडे ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या टार्गेटवर एसीबीचे संचालक समीर वानखेडे होते. पण आता वानखेडेंबरोबर मलिकांच्या ट्रिगर पॉईंटवर भाजप देखील आहे. आर्यन खान ड्रग्ज केसला केपी गोसावीच्या फरार होण्याने एक वेगळं वळण मिळालं. आता त्याच केपी गोसावी आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्याच्या बायकोची एका खाजगी कंपनीत पार्टनरशीप आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केलाय. तसंच येत्या विधानसभा अधिवेशनात तो नेता कोण?, हे नावंही जाहीर करेन, असं म्हणत मलिकांनी फटाक्यांची माळ सुरुच ठेवली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांनी तुफान बॅटिंग केलीय. दररोज पत्रकार परिषदांच्या माध्यमातून ते नवा पॉइंट शोधून काढून वानखेडे, गोसावी यांच्यावर कडाडून हल्ले चढवतायत. कालपर्यंत एनसीबी, वानखेडे यांच्या कारवाईवर शंका उपस्थित करणाऱ्या मलिकांनी आता नवा आरोप करुन बॉम्ब फोडलाय.

Follow Us