AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिलिंद नार्वेकर यांच्या मुरुडमधील बंगल्यावर हातोडा, किरीट सोमय्यांकडून व्हिडीओ ट्विट

मिलिंद नार्वेकर यांच्या मुरुडमधील बंगल्यावर हातोडा, किरीट सोमय्यांकडून व्हिडीओ ट्विट

| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Aug 22, 2021 | 2:28 PM
Share

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा दापोलीतील अलिशान बंगला जमीनदोस्त करण्यात आला आहे. परवानगी न घेताच हा बंगला बांधण्यात आल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा दापोलीतील अलिशान बंगला जमीनदोस्त करण्यात आला आहे. परवानगी न घेताच हा बंगला बांधण्यात आल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर आज या बंगल्यावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. नार्वेकर यांच्या बंगल्यावरील कारवाई हा मुख्यमंत्र्यांसाठी मोठा दणका असल्याचं मानलं जात आहे.

मिलिंद नार्वेकर यांचा मुरुड दापोलीच्या समुद्र किनारी अलिशान बंगला होता. हा बंगला पाडण्याचे काम आज सकाळपासूनच सुरू करण्यता आले. जेसीबी मशीन लावून हा बंगला तोडण्यात आला आहे. या बंगल्याची प्रत्येक भिंत न् भिंत पाडण्यात आली आहे. किरीट सोमय्या यांनी या तोडक कारवाईचा व्हिडीओ ट्विट करून माहिती दिली आहे. तसेच हा बंगला किती प्रमाणात तोडला याची पाहणी करण्यासाठी सोमय्या स्वत: दापोलीत जाणार आहेत.

Follow Us