Santosh Deshmukh Case Video : ‘भैय्याला आडवा आलेला…’, क्रूर हत्येवेळी आरोपी कृष्णा आंधळेचा व्हिडीओ कॉल, CID च्या जबाबात मोठी माहिती उघड
देशमुख हत्या या प्रकरणात रोज नव-नवे खुलासे होत असताना संतोष देशमुख यांचे कपडे काढून त्यांना विवस्त्र करुन जबर मारहाण केली. तेव्हाचे विदारक १५ व्हिडिओ आणि ८ फोटो पोलिसांकडे आलेत त्यानंतर तपास वेगाने सुरू झाला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करताना आरोपींनी ग्रुपवर व्हिडिओ कॉल केल्याचे सीआयडीच्या चार्जशीटमधून समोर आले होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे यांने मोकारपंथी नावाच्या एका व्हॉट्सअप ग्रृपवर संतोष देशमुखांची क्रूर हत्या करतानाच्या वेळेचा व्हिडीओ ऑनलाईन दाखवला होता. संतोष देशमुख याला किती क्रूर पद्धतीने मारत आहोत, हे त्याने त्या व्हिडिओ कॉलमधून ग्रृपमधील सदस्यांना दाखवले होते. काही मिनिटे हा व्हिडिओ कॉल सुरु असल्याचीही माहिती समोर आली होती. दरम्यान, या प्रकरणात आणखी एक मोठी माहिती समोर येत आहे. मोक्कारपंथी नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आरोपी कृष्णा आंधळेने केलेला व्हिडीओ कॉल होता. यावेळी कृष्णा आंधळे हा कॉलवर सुदर्शन भैय्याला आडला आलेला सरपंच.. असं म्हणाल्याची माहिती समोर आली आहे. सीआयडीने घेतलेल्या जबाबात मोक्कारपंथी व्हॉट्सअप ग्रुपच्या सदस्यांनी ही माहिती दिली आहे.
Published on: Mar 07, 2025 11:41 AM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
