Santosh Deshmukh Case Video : देशमुखांच्या क्रूर हत्येवेळी आरोपी कृष्णा आंधळेचा कोणाला व्हिडीओ कॉल? मोठी माहिती उघड
संतोष देशमुख यांचे कपडे काढून त्यांना विवस्त्र करुन जबर मारहाण केली. तेव्हाचे विदारक १५ व्हिडिओ आणि ८ फोटो पोलिसांकडे आलेत. यानंतर आता संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करताना आरोपींनी ग्रुपवर व्हिडिओ कॉल केल्याचे सीआयडीच्या चार्जशीटमधून समोर आले आहे.
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सातत्याने आरोप करण्यात येणाऱ्या धनंजय मुंडे यांनी आज आपला राजीनामा दिला आहे. अशातच या प्रकरणात रोज नव-नवे खुलासे होत असताना संतोष देशमुख यांचे कपडे काढून त्यांना विवस्त्र करुन जबर मारहाण केली. तेव्हाचे विदारक १५ व्हिडिओ आणि ८ फोटो पोलिसांकडे आलेत. यानंतर आता संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करताना आरोपींनी ग्रुपवर व्हिडिओ कॉल केल्याचे सीआयडीच्या चार्जशीटमधून समोर आले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे यांने हत्येवेळी व्हॉट्सअप वर व्हिडीओ कॉल केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मोकारपंथी नावाच्या एका व्हॉट्सअप ग्रृपवर आरोपीने देशमुखांची क्रूर हत्या करतानाच्या वेळेचा व्हिडीओ ऑनलाईन दाखवला होता. संतोष देशमुख याला किती क्रूर पद्धतीने मारत आहोत, हे त्याने त्या व्हिडिओ कॉलमधून दाखवले होते. काही मिनिटे हा व्हिडिओ कॉल सुरु असल्याची माहिती मिळतेय. तर ग्रुपवरील व्हिडिओ कॉलचा हा पुरावा मुंबई सीआयडीच्या चार्जशीटमधून समोर आला आहे.

कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती

कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
