AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना आणखी उशिर

जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना आणखी उशिर

| Updated on: Sep 26, 2026 | 7:54 AM
Share

अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुरू झालेल्या मुंबईतील गणपती विसर्जन मिरवणुका दुसऱ्या दिवशीही सुरू आहेत. लालबागचा राजा गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ होत आहे. तर इतरही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती विसर्जनासाठी हळूहळू पुढे सरकत आहेत. हजारो गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी उपस्थित आहेत, ज्यामुळे विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

मुंबईत अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने सुरू झालेल्या गणपती विसर्जन मिरवणुका दुसऱ्या दिवशीही सुरू आहेत. लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झाला असून, त्याची भव्य मिरवणूक पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी झाली आहे. फुलांचे हार अर्पण करून आणि उत्साहाने घोषणा देत भक्त राजाचे स्वागत करत आहेत.

गिरगावात पोहोचल्यानंतरही राजाला चौपाटीपर्यंत पोहोचायला वेळ लागणार आहे. मागच्या वर्षीचा विसर्जनाचा रेकॉर्ड मोडला जातो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचसोबत इतरही अनेक मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीकडे पुढे सरकत आहेत. पोलिसांकडून या संपूर्ण मिरवणुकीवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच, मिरवणूक पुढे सरकण्यासाठी आवाहन केले जात आहे. मुंबई आणि पुण्यासह अनेक शहरांमध्ये विसर्जनाचा हा सोहळा तासनतास सुरू असतो.

Published on: Sep 26, 2026 07:54 AM

Follow Us