Latur Rain Updates : लातूरमध्ये मुसळधार पाऊस; घरात पाणी शिरल्याने नागरिकांनी रात्र जागून काढली
Latur Weather : लातूर शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढलेलं आहे. पावसाचं पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत.
लातूर शहरात काल रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी सचल्याने हे पाणी अनेक घरांमध्ये देखील शिरलं. त्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे.
राज्यात मान्सूनने दाखल होताच थैमान माजवलं आहे. 2 दिवस राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या आहेत. त्यामुळे अनेक भागांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली. त्यानंतर काल पावसाने विश्रांती घेतली असली तरी काही ठिकाणी मात्र संध्याकाळनंतर पावसाने हजेरी लावली. लातूर शहरासह जिल्ह्यात देखील काल जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे लातूरच्या सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचुन हे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने अनेकांना रात्र जागून काढावी लागली आहे. तर पावसाचा जोर बघता अनेकांच्या घराच्या छतातून देखील पाणी गळायला लागल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झालेले आहेत.

