Latur News : लातूर मनपा आयुक्तांनी स्वत:वर गोळी झाडल्याचे प्रकरण; मनोहरेंना एअर अॅम्ब्यूलन्सने मुंबईत आणणार
Latur Commissioner Manohare News : लातूरचे मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यात त्यांच्या डोक्याला गोळी लागली आहे. त्यांना उपचारासाठी एअर अॅम्ब्यूलन्सने मुंबईत आणले जात आहे.
लातूरचे मनपा आयुक्त मनोहरे यांनी काल स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. त्यानंतर त्यांच्यावर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर आज मनोहरे यांना एअर अॅम्ब्यूलन्सने मुंबईत पुढील उपचारासाठी आणलं जात आहे. त्यांच्यावर पुढील उपचार हे कोकिलाबेन रुग्णालयात पुढील उपचार करण्यात येणार आहे.
बाबासाहेब मनोहरे यांनी काल आपल्या राहत्या घरी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली होती. लातूरचे मनपा आयुक्त आहेत. त्यांच्यावर लातूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तेथे त्यांची शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. त्यानंतर आता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना एअर अॅम्ब्यूलन्सने मुंबईला आणलं जाणार आहे. मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे. त्यांच्यासोबत डॉक्टरांची एक तुकडी या एअर अॅम्ब्यूलन्समध्ये देण्यात आलेली आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

