गुणरत्न सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, ‘आगे आगे देखो होता है क्या…’
लवकरच बिग बॉस हिंदीचे १८ वे पर्व सुरु होणार आहे. बिग बॉस हिंदीच्या आगामी पर्वासाठी पहिला स्पर्धक ठरला असून त्या स्पर्धकाने स्वत:च नाव थेट जाहीर केलं आहे. एसटी महामंडळाच्या संपादरम्यान ज्यांची तुफान चर्चा होती, ते गुणरत्न सदावर्ते हिंदी बिग बॉस दिसणार आहे.
आपल्या आक्रमक बोलण्याच्या स्टाईलने राजकीय वर्तुळात वकील गुणरत्न सदावर्ते हे नेहमीच चर्चेत असतात. पण आता गुणरत्न सदावर्ते हे वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केल्याचे पाहायला मिळाले आहे. गुणरत्न सदावर्ते हे लवकरच बिग बॉस हिंदीच्या 18 व्या पर्वात सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले आहे. ‘आगे आगे देखो होता है क्या…’, असं वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे तर आम्ही काळजी करत नाही लोक आम्हाला घाबरतात, असंही सदावर्ते म्हणाले. तर लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची लढाई आहे, असं सदावर्ते यांचं म्हणणं आहे. हमारा नाम काफी है, म्हणत लोक आम्हाला घाबरतात आम्ही तर डंके की चोटपर बोलतो. म्हणून आम्ही कोणाची काळजी करत नाही तर लोक आमची काळजी करतात, असं ते म्हणाले.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

