Laxman Hake | माझी कोणतीही राजकीय चाल नाही, मी ओबीसी आंदोलक… माघारीनंतर लक्ष्मण हाके यांची पहिली प्रतिक्रिया
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवण्याची की नाही? या संदर्भात अखेर लक्ष्मण हाके यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. “बारामतीमध्ये सहानुभूतीची लाट आहे. ही वस्तूस्थिती असताना सुद्धा काही प्रश्नांकडे मला लक्ष वेधून घ्यायचं होतं. मी कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही. माझी कुठलीही राजकीय चाल नाही. मी एक ओबीसी आंदोलक असून भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी मी नेहमीच आवाज उठवतो. तशी मला स्पेस मिळाली आहे” असं लक्ष्मण हाके म्हणाले.
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवण्याची की नाही? या संदर्भात अखेर लक्ष्मण हाके यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. “बारामतीमध्ये सहानुभूतीची लाट आहे. ही वस्तूस्थिती असताना सुद्धा काही प्रश्नांकडे मला लक्ष वेधून घ्यायचं होतं. मी कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही. माझी कुठलीही राजकीय चाल नाही. मी एक ओबीसी आंदोलक असून भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी मी नेहमीच आवाज उठवतो. तशी मला स्पेस मिळाली आहे” असं लक्ष्मण हाके म्हणाले. “या निवडणुकीच्या निमित्ताने आक्रस्ताळेपणे काही गोष्टी आक्रमकपणे मांडण्याचा प्रयत्न करत होतो. भरणेमामांनी मला सांगितलं. महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांनी, सुनेत्राताई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मला माघारीसाठी विनंती केली. उदय सामंत, धनंजय मुंडे या सर्वांनी मला कॉल केले. त्यानंतर मी माघार घेण्याचा विचार केला,” असं लक्ष्मण हाके म्हणाले. “माझी लढाई का आहे? मागच्यावर्षात सुद्धा माझे काही प्रश्न मार्गी लागले नाहीत. आमची चळवळीची भूमिका यापुढेही सुरु राहिल. मी दादांना डोळ्यासमोर ठेऊन आक्रमकपणे भूमिका मांडत होतो. संघर्ष करताना कधी काळजी केली नाही. प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. ओबीसींच्या अनेक मागण्या आहेत. निवडणुकीआधी सरकारने 18 महामंडळं घोषित केली होती. पण त्या महामंडळांना अजून अध्यक्ष, कार्यालय मिळालेलं नाही” याकडे लक्ष्मण हाके यांनी लक्ष वेधलं. “अनेक मुद्यांवर आक्रमकपणे भूमिका मांडली. या सर्व गोष्टी असताना सुनेत्राताईंचा फोन आला. एवढी सगळी मंडळी कॉल करत असताना आपण विचार केला पाहिजे. म्हणून माघार घेतली,” असंही लक्ष्मण हाके यांनी सांगितलं. तसेच आपण बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढणार नाही, असंही त्यांनी जाहीर केलं.
Published on: Apr 06, 2026 10:48 AM
कोणचा विश्वासच बसे ना! 4 महिन्यांपूर्वीच सियाने... अखेर मोबाईल डाटा
पावसाचा हाहाकार! वादळी वाऱ्यासह पावसाचा आणखी मोठा दणका, तेलाने खचाखच
अटल सेतूपासून Missing Link पर्यंत...पावसाने सरकारचे वाभाडे काढले
राजकीय हालचाली वाढल्या! विजय वडेट्टीवारांच्या सूचक विधानाने खळबळ, शरद

