कॉंग्रेसवाले आणि भाजपावाले दोघेही मिलींद देवरांची जिरवतील, विजय वडेट्टीवार यांची टीका
कॉंग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. कॉंग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांचे घराणे कॉंग्रेसचे आहे. त्यांचे वडील मुरली देवरा पासून गेली अनेक वर्षे त्यांना पदे मिळाली आहे. ज्यांना सर्वकाही मिळाले आहे, त्यांची वृत्ती जर अशा प्रकारची असेल तर ती बेईमानी आहे आणि बेईमानी फार काळ टीकत नाही असेही विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. मिलिंद देवरा यांची कॉंग्रेसवाले आणि भाजपावाले दोघेही जिरवतील असाही दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
मुंबई | 14 जानेवारी 24 : कॉंग्रसचे नेते मिलिंद देवरा यांनी शिवसेना एकनाथ गटात प्रवेश केला आहे. मिलिंद देवरा यांच्या प्रवेशाने कोणालाही फारसे आश्चर्य वाटलेले नाही. गेले अनेक दिवस ते कॉंग्रेस नेतृत्वावर नाराज होते. या प्रकरणात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मिलिंद देवरा यांच्यावर टीका केली आहे. दक्षिण मुंबईत लोकसभा मतदार संघात सिटींग खासदार शिवसेनेचे अरविंद सावंत आहेत, त्यामुळे या जागेवर शिवसेनेचाच हक्क आहे. खासदारकीच्या लोभापायी असा निर्णय घेणे अत्यंत चुकीचे आहे. नीतीमत्ता आणि नैतिकता संपुष्ठात आल्याचे हे द्योतक असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. या जागेवरुन मुळात भाजपा आणि एकनाथ गटात वाद सुरु आहेत. त्यामुळे त्यांना तिकीट मिळणारच नाही. आणि मिळाले तरी कॉंग्रेसवाले आणि भाजपावाले दोघेही मिलिंद देवरा यांची जिरवतील ते तेथून निवडून येणार नसल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

