‘आमची सत्ता आल्यावर पुन्हा रश्मी शुक्ला यांची चौकशी करणार’, कुणी दिला इशारा?
VIDEO | आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला हे फोन टॅपिंग प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत होत्या, मात्र त्यांच्यावरील दोन्ही एफआयआर रद्द केल्यानं त्यांना दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले...
अमरावती, ९ सप्टेंबर २०२३ | आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला हे फोन टॅपिंग प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत होत्या मात्र त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना विरोध पक्ष नेत्यांचे फोन टॅपिंग झाल्याचा आरोप त्यांच्यांवर झाला होता. या प्रकरणी त्यांच्यावरील दोन्ही एफआयआर रद्द करण्यात आले आहे. यामुळे रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, रश्मी शुक्ला यांच्या विरुद्ध असलेल्या एफआयआर रद्द केल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक झाले आहेत. सरकार सत्तेच्या भरोशावर खऱ्याचं खोट आणि खोट्याच खरं करत आहे. सत्तेचा गैरवापर करण्यात येत आहे. आमची सत्ता आल्यावर नव्याने रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध चौकशी सुरू करू आणि यामध्ये जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई करू, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

