Ajit Pawar | संभाव्य धोका लक्षात घेवून अहमदनगर येथे 61 गावात लॉकडाऊन : अजित पवार

अहमदनगरमधल्या संगमनेर आणि पारनेर तालुक्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे अहमदनगरच्या 61 गावांमध्ये पुन्हा लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra again in 61 villages of Ahmednagar) घोषित करण्यात आला आहे.

अहमदनगरच्या 61 गावांमध्ये पुन्हा लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra again in 61 villages of Ahmednagar) घोषित करण्यात आला आहे. या 61 गावांमध्ये अचानक 10 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण केस (Corona in Maharashtra) आढळल्याने जिल्हाधिकाऱ्यांना लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या गावांमध्ये 10 दिवसांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात 24 गावांमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील या 61 गावांमध्ये जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

जिल्ह्यात दररोज 500 ते 800 नवीन कोरोना प्रकरणे नोंदवली जात आहेत. कोरोना पॉझिटिव्ह दर 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ज्या गावांमध्ये 20 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केले जात आहेत, तेथे कंटेनमेंट झोन घोषित करणे, जमावबंदी, कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आणि अशा गावांमध्ये 100% लसीकरण करणे आवश्यक आहे. या संदर्भात, संबंधित गावांना कोरोना प्रभावित भागातील निर्बंध आणि नियमांचे पालन करण्याचे आदेशही देण्यात आले. पण त्या निर्बंधांचे पालन झाले नाही. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI