Lok Sabha Election Result 2024 : महाराष्ट्रात भाजपला फोडाफोडी भोवली? दिग्गज नेते, राज्यात सत्ता तरी युतीला फटका का?
मोठं संख्याबळ असताना भाजपला फोडाफोडीच भोवली का? यावरून या निकालाकडे पाहिलं जातंय. कारण २०१९ ला महायुती असताना ४८ पैकी ४१ जागा मिळवणारी महायुती आता २०२४ मध्ये यंदा तीन पक्ष आणि राज ठाकरेंचा बिनशर्त पाठिंबा असताना अवघ्या १७ जागांवर आली आहे.
नुकताच लोकसभेचा निकाल लागला. यामध्ये पूर्वी पेक्षा काहीसं वेगळंच चित्र यंदाच्या निकालात पाहिला मिळालं. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला तर महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश काही मिळालं नाही. दरम्यान, फोडाफोडी जनतेला पटलेली नाही, असं वक्तव्य करत एकनाथ खडसे यांनी लोकसभेच्या निकालावर भाष्य केले आहे. इतकंच नाहीतर एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका केली. मोठं संख्याबळ असताना भाजपला फोडाफोडीच भोवली का? यावरून या निकालाकडे पाहिलं जातंय. कारण २०१९ ला महायुती असताना ४८ पैकी ४१ जागा मिळवणारी महायुती आता २०२४ मध्ये यंदा तीन पक्ष आणि राज ठाकरेंचा बिनशर्त पाठिंबा असताना अवघ्या १७ जागांवर आली आहे. २०१९ मध्ये भाजपचे २३ खासदार निवडून आले तर यंदा भाजपच्या १४ खासदारांचं नुकसान होऊन फक्त ९ च खासदार निवडून आलेत. आमदार आणि नेते म्हणजेच जनता हा भ्रम जनतेने खोटा ठरवला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
Published on: Jun 06, 2024 10:45 AM
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
