निवडणूक जाहीर होण्यापूर्वी ‘मविआ’ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
आगामी विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महाविकासआघाडीची पत्रकार परिषद झाली. मुंबईत महाविकास आघाडीची ही पत्रकार परिषद आज झाली. यावेळी महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीची पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची काल गोळी झाडून रात्री हत्या झाली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणावर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. ‘मला त्याबाबतची पुरेशी माहिती नाही. गंभीर गुन्हा आहे. अशावेळी तपासयंत्रणेवर परिणाम होईल असं भाष्य आम्ही करणार नाही. याची जबाबदारी सत्ताधारी आणि गृहविभागाची आहे. त्यांना डिटेल देता येत नाही. त्यांना सत्ता त्याग करण्याशिवाय पर्याय नाही’, असं शरद पवार म्हणाले. तर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. आम्ही एक आहोत. आम्ही मुख्यमंत्री एकमताने ठरवू. महाराष्ट्र वाचवायचा आहे. महाराष्ट्र धोक्यात आहे. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आमच्यासाठी महत्त्वाची नाही. खोकेवाल्यांसाठी आहे, असं मोठं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं. ‘गद्दारी केवळ शिवसेना किंवा राष्ट्रवादीशी केली असं नाही. महाराष्ट्राशी गद्दारी झाली असं नाही. मोदी शाह यांची गुलाम झाली आहे. अशा पद्धतीने सरकार चाललं आहे. हे सरकार घालवलं पाहिजे. बाबा सिद्दीकीची काल जी हत्या झाली. मुंबईला दोन पोलीस कमिशनर आहे. अजून पाच वाढवा. जे लाडके असतील त्यांना कमिशनर करा. पण कारभाराचं काय?’ असा सवाल करत तुम्ही राज्य कारभार करण्याच्या लायकीचे नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला.
Published on: Oct 13, 2024 03:15 PM
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
