AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल

महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत… व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Jun 08, 2026 | 1:55 PM
Share

महाबळेश्वर हा पर्यटनस्थळ नेहमीच पर्यटकांनी सुसज्ज असतो. आशात महाबळेश्वरच्या एसटी बस स्थानकात धक्कादायक घटना घडली. एसटी बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाच्या अरेरावीमुळे मोठा गोंधळ उडाला. बस तब्बल 1 तास उशिराने सोडण्यात आल्याने प्रवासी संतप्त झाले होते.

महाबळेश्वर हा पर्यटनस्थळ नेहमीच पर्यटकांनी सुसज्ज असतो. आशात महाबळेश्वरच्या एसटी बस स्थानकात धक्कादायक घटना घडली. एसटी बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाच्या अरेरावीमुळे मोठा गोंधळ उडाला. बस तब्बल 1 तास उशिराने सोडण्यात आल्याने प्रवासी संतप्त झाले होते. याबाबत कारण विचारण्यासाठी काही प्रवासी वाहतूक निरीक्षकांकडे गेले असता संबंधित अधिकाऱ्याने उद्धटपणे उत्तर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकाराची माहिती घेण्यासाठी स्थानिक पत्रकार बस स्थानकात पोहोचले होते. मात्र पत्रकारांशी बोलताना वाहतूक निरीक्षकाने वादग्रस्त वक्तव्य करत “पत्रकार हे ब्लॅकमेलर दलाल आहेत” असा शब्दप्रयोग केल्याने वातावरण आणखी तापले. या घटनेमुळे बस स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याच प्रकरणाचा एक व्हिडीओदेखील व्हायरल होत आहे.

प्रवाशांनी संबंधित अधिकाऱ्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. पर्यटक प्रवाशांनी देखील महाबळेश्वरसारख्या पर्यटनस्थळी अशा प्रकारची वागणूक मिळणे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दिली. या घटनेनंतर एसटी प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 08, 2026 01:55 PM

Follow Us