‘वाल्मिक कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण…’, महादेव गित्तेच्या पत्नीचा खळबळजनक आरोप
वाल्मिक कराड आणि गित्ते टोळीचा आधीपासूनच 36 चा आकडा राहिलाय. पण वाल्मिक कराडला बीड कारगृहात व्हीआयपी सुरक्षा देता यावी यासाठीच अडथळा ठरणारे इतर कैदी मारहाणीच्या कारणाने दुसरीकडे पाठवण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते.
बीड जिल्ह्यातील तुरूंगात वाल्मिक कराड विरोधक बबन गित्ते गँगची टोळी आणि दुसऱ्या बराकीत कराड विरोधी आठवले गँगची टोळी होती. गित्ते आणि आठवले टोळीकडून घुले आणि कराडला मारहाण केल्याची बातमी गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आली होती. दरम्यान हे वृत्त तुरूंग प्रशासनाने फेटाळलं होतं. मात्र तरीही यातील काही आरोपी बीडमधून हर्सूलच्या तुरुंगात तर काही आरोपी नाशिकच्या तुरुंगात रवाना करण्यात आले होते. दरम्यान, यातील आरोपी महादेव गित्ते यांच्या पत्नी मिरा गित्ते यांनी बीडचे एसपी कॉवत यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. ‘माझ्या पतीवर कारागृहात हल्ला करण्यात आला. त्याबद्दल गुन्हा दाखल करायचा आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेतली. महादेव गिते याला अमानुष मारहाण करण्यात आली. तरीदेखील त्याला दवाखान्यात नेण्यात आले नाही. माझ्या पतीच्या जीवाला कराड गॅंगपासून धोका आहे. आम्हाला सीसीटीव्ही देऊन घडलेल्या घटनेवर सविस्तर कारवाई व्हावी हीच आमची मागणी आहे. वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगने माझ्या पतीसह त्यांच्या मित्राला मारहाण केली आहे.’, असा आरोपही त्यांनी केला.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

