Mahadev Gitte : वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं; महादेव गीतेच्या पत्नीचा दावा
Walmik Karad - Mahadev Gitte Dispute : महादेव गीते आणि वाल्मिक कराड मारहाण प्रकरणी महादेव गीते याची पत्नी मीरा गीते हीने या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देत बीड पोलिसांवर आरोप केले आहेत.
बीड कारागृहात कराड आणि गीते टोळीमध्ये झालेल्या राड्यानंतर महादेव गीते याला संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात हलवण्यात आलं आहे. यावेळी वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच आम्हाला मारहाण झाली असल्याचा आरोप महादेव गीते याने केला आहे. महादेव गीतेसह मुकुंद गीते, राजेश नेहरकर यांना देखील बीड कारागृहातून हलवण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता महादेव गीते याची पत्नी मीरा गीते यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलताना त्या म्हणाल्या की, ‘गुढीपाडवाच्या आधीपासून कराड आणि त्याच्या टोळीची प्लॅनिंग सुरू होती. हा प्रकार अत्यंत चुकीचा घडला आहे. माझ्या पतीला मारहाण होताना सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. तुम्ही तिथले सीसीटीव्ही फुटेज तपासा. माझं माझे पती महादेव गीते यांच्याशी बोलणं झालं आहे. त्यांनी मला सांगितलं की, वाल्मिक कराड याने कारागृहाच्या जेलरच्या ऑफिसमध्ये बसून ही मारहाणीची प्लॅनिंग केली आहे. 10 जणांनी मिळून माझ्या नवऱ्याला मारलं’, असंही मीरा गीते म्हणाल्या आहेत.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

