MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 12 June 2021
महाफास्ट न्यूज 100, राज्यासह देश विदेशातील घडामोडी, मनोरंजन विश्वातील बातम्यांचा आढावा (Mahafast 100 news)
महाफास्ट न्यूज 100
- मुंबई आणि कोकणात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान खात्याचा मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत रेड अलर्ट
- मुंबईला पावसाने पुन्हा झोडपलं, मिठी नदीचं पाणी रेल्वे रुळावर, मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ ठप्प, चाकरमान्यांचं प्रचंड हाल
- तीन महिने अंडरग्राऊंड ड्रेनेज टनलला परवानगी दिली नाही, मोदी सरकारमुळेच मुंबई तुंबली, शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचा दावा
- ब्लॅक फंगसची औषधे जीएसटी मुक्त, रेमडेसिवीरवर 7 टक्के सूट तर व्हॅक्सिनवर 5 टक्के कर कायम; केंद्र सरकारची मोठी घोषणा
- प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर शरद पवारांच्या पंतप्रधान पदाच्या उमदेवारीच्या चर्चांना उधाण, भाजपविरोधी आघाडी निर्माण करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण
- काँग्रेस यूपीएचा आत्मा, प्रशांत किशोर यांनी दोनवेळा सांगितलंय, राहुल गांधींच पंतप्रधान होणार, नाना पटोलेंचा दावा
- काँग्रेसच्या आघाडीत किती पक्ष उरलेयत हे आता तपासायला हवे, नवी मजबूत आघाडी उभारण्याची गरज, संजय राऊतांकडून टोला
- कितीही स्ट्रॅटेजी करा, 2024 मध्ये येणार तर मोदीच, पवार-प्रशांत किशोर भेटीवर देवेंद्र फडणवीसांचं भाष्य
- 2024 ला मोदीच, जनता पार्टीसारखा प्रयोग मोदींविरोधात होऊन देणार नाही, रामदास आठवलेंचीही उडी
- संभाजीराजे मान्य करत नसले तरी ऑन पेपर ते भाजप खासदार, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला
- मी 2007 पासून मराठा आंदोलनात, हे केव्हा आले कळत नाही, मला कुणी शिकवण्याची गरज नाही; संभाजी छत्रपतींनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं
- ठाकरे-चव्हाणांनी दिल्लीवारी करून लोकांना वेड्यात काढलं; आरक्षणासाठी 27 जून रोजी मुंबईत बाईक रॅली, विनायक मेटेंची घोषणा
- फडणवीसांच्या सरकारमध्ये शिवसेनेला गुलामासारखी वागणूक मिळाली; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
- ‘आपली बेईमानी झाकण्यासाठी गुलाम या शब्दाचा वापर’, मुनगंटीवारांचा संजय राऊतांवर पलटवार
- वारीची परंपरा टिकली पाहिजे, पण कुंभमेळ्यात घडलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दक्षता, अजित पवारांचं स्पष्टीकरण
Latest Videos
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

