VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10.30 AM | 19 July 2021
रात्रभरापासून कोसळणाऱ्या पावसाने सकाळी चांगलाच जोर धरला. त्यामुळे ठाणे ते नाहूर स्टेशन दरम्यान रेल्वे रुळावर पाणीच पाणी झालं. संपूर्ण रेल्वे ट्रॅक जलमय झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
आज तिसऱ्या दिवशी मुंबईत पावसाचा कहर सुरूच आहे. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे रुळावरही पाणी भरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवर 20 मिनिटे उशिराने लोकल धावत असल्याने चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने आज तिसऱ्या दिवशीही मुंबईला झोडपले.
रात्रभरापासून कोसळणाऱ्या पावसाने सकाळी चांगलाच जोर धरला. त्यामुळे ठाणे ते नाहूर स्टेशन दरम्यान रेल्वे रुळावर पाणीच पाणी झालं. संपूर्ण रेल्वे ट्रॅक जलमय झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. या मार्गावरून रेल्वे धीम्यागतीने सुरू होती. तब्बल 20 मिनिटे उशिराने लोकल धावत होती. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर निघालेल्या चाकरमान्यांचा खोळंबा झाला.
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश

