VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 AM | 20 July 2021

केंद्रातील दोन केंद्रीय मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले. त्यांचीही हेरगिरी करण्यात आली. विशेष म्हणजे ते मंत्री नसताना ही हेरगिरी केली. नंतर त्यांना मंत्रिपदे दिली.

केंद्रातील दोन केंद्रीय मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले. त्यांचीही हेरगिरी करण्यात आली. विशेष म्हणजे ते मंत्री नसताना ही हेरगिरी केली. नंतर त्यांना मंत्रिपदे दिली. हे सर्वच धक्कादायक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यावर खुलासा केला पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली आहे. दोन केंद्रीय मंत्र्यांवरही पाळत ठेवली. केंद्रातील नवे रेल्वे राज्यमंत्री अश्विनी वैष्णव आणि प्रल्हाद पटेल यांचीही हेरगिरी केली गेली. हे धक्कादायक आहे.