VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 14 October 2021
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करताना रावणाला मदत करणारी शुर्पणखा, असा बोचरा वार केला. महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी चाकणकरांच्या नावावर शिक्कामोर्बत झाल्याचा बातम्या आल्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्विट करुन चाकणकरांवर बोचरी टीका केली.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करताना रावणाला मदत करणारी शुर्पणखा, असा बोचरा वार केला. महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी चाकणकरांच्या नावावर शिक्कामोर्बत झाल्याचा बातम्या आल्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्विट करुन चाकणकरांवर बोचरी टीका केली. आता रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना 4 शब्दात उत्तर दिलं आहे. “माझ्या नावावर शिक्कामोर्तब वगैरे अशा बातम्या प्रसारमाध्यमांमधून ऐकते आहे. माझ्यापर्यंत कोणतीही अशी माहिती नाही. राष्ट्रवादी महिला संघटनेचं उत्तम काम सुरु आहे. मी समाधानी आहे. इच्छा वगैरे असा काही विषय नाही. चित्राताईंच्या ट्विटवर मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

