MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 16 August 2021
कराड यांची जनआशीर्वाद यात्रा ही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्यासाठी गोपीनाथ गडावरून निघत असल्याची चर्चा सुरू होती. मात्र यावर आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांची जनआशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad yatra) उद्यापासून (16 ऑगस्ट) सुरु होत आहे. ही यात्रा बीडमधील परळी येथील गोपीनाथ गडावरुन (Gopinath Gad) निघणार आहे. कराड यांची जनआशीर्वाद यात्रा ही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्यासाठी गोपीनाथ गडावरून निघत असल्याची चर्चा सुरू होती. मात्र यावर आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि राजकीय नेत्यांचं अतूट नातं आहे. कराड यांची जनसंवाद यात्रा ही मुंडे साहेब यांच्यावर असलेले प्रेम आहे. ही मुंडे यांच्याविषयीची भावना आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळात मुंडे भगिनींना स्थान न दिल्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा होती. याच चर्चेनंतर मुंडे भगिनींच्या समर्थकांनी राजीनामासत्र सुरु केले होते. राजीनामासत्रांचा एक अंक संपल्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या भागवत कराडांच्या जनआशीर्वाद यात्रेला उद्यापासून सुरुवात होत आहे. या यात्रेला गोपीनाथ गडावरून सुरुवात होणार आहे. पंकजा यांची नाराजी दूर करण्यासाठीच यात्रेची सुरुवात गोपीनाथ गडावरुन सुरु होत असल्याची चर्चा आहे. त्यावर बोलताना “कराड यांची जनसंवाद यात्रा ही मुंडे साहेब यांच्यावर असलेले प्रेम व त्यांच्या विषयीची भावना आहे. त्यामुळेच कराड ही यात्रा गोपीनाथ गडावरुन काढत आहेत. गोपीनाथ मुंडे आणि राजकीय नेत्यांचं अतूट नातं आहे,” असं पंकजा यांनी म्हटलंय.
Published on: Aug 16, 2021 08:41 AM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी

