AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 22 July 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 22 July 2021

| Edited By: | Updated on: Jul 22, 2021 | 8:40 AM
Share

मागील चार दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रातही मुसळधार पावसानं हजेरी लावली असून त्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

गेल्या चार दिवसांपासून बरसणाऱ्या दमदार पावसामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं बारवी धरण 52 टक्के भरलंय. धरणाची पाणीपातळी 65.80 मीटरवर पोहोचली आहे. आणखी काही दिवस पाऊस असाच बरसत राहिला तर मागील वर्षीच्या तुलनेत यंदा हे धरण लवकर भरण्याची शक्यता आहे. (Water levels rise at barvi dam supplying water to Thane)

मागील चार दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रातही मुसळधार पावसानं हजेरी लावली असून त्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. बदलापूरच्या बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मीरा भाईंदर या महापालिका, अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपालिका, तसेच एमआयडीसी आणि स्टेम या प्राधिकरणांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळं संपूर्ण जिल्ह्याची तहान या धरणातून भागते. यासाठी बारवी धरणातून उल्हास नदीत दररोज पाण्याचा ठरावीक विसर्ग केला जातो. मात्र गेल्या 15 दिवसांपासून उल्हास नदीला पावसामुळे मोठा प्रवाह आला असून त्यामुळं बारवी धरणातून सोडलं जाणारं पाणी बंद करण्यात आलंय. यामुळे धरण वेगाने भरू लागलंय.

Published on: Jul 22, 2021 08:40 AM