MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 25 October 2021

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटींची सेटलमेंट झाल्याचा दावा केला होता. त्यातील 8 कोटी रुपये हे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप केला होता. आता त्यांच्या याच आरोपांवर एनसीबीने स्पष्टीकरण दिलं आहे. विशेष म्हणजे एनसीबी या आरोपांप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार होती.

क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. एनसीबीच्या या कारवाईत साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तसेच त्यांचा या संदर्भातील एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. त्यामध्ये त्यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटींची सेटलमेंट झाल्याचा दावा केला होता. त्यातील 8 कोटी रुपये हे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप केला होता. आता त्यांच्या याच आरोपांवर एनसीबीने स्पष्टीकरण दिलं आहे. विशेष म्हणजे एनसीबी या आरोपांप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार होती. त्यासाठी पत्रकार परिषदेची दिवसभरात तीन वेळा वेळ ठरवण्यात आली. त्यानंतर पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. आता एनसीबीने प्रसिद्ध पत्रक जारी करत भूमिका मांडली आहे. यामध्ये एनसीबीने साईल यांना कोर्टात आपलं म्हणणं मांडण्याचा सल्ला दिला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI