MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 31 August 2021

हे बोगस सरकार आहे, आम्ही नारायण राणेंचे कार्यकर्ते नाही, आम्ही राज ठाकरेंचे सैनिक आहोत. जन आशिर्वाद असो किंवा नेत्या मंडळींचे कार्यक्रम होत आहेत मग आम्हला का बंदी असा सवाल देखील जाधव यांनी केला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Rohit Dhamnaskar

Aug 31, 2021 | 7:54 AM

पोलिसांनी आणि राज्य सरकारने कितीही दबाव तंत्राचा वापर केला तरी आम्ही दहीहंडी साजरी करणार, असा इशारा मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. हे बोगस सरकार आहे, आम्ही नारायण राणेंचे कार्यकर्ते नाही, आम्ही राज ठाकरेंचे सैनिक आहोत. जन आशिर्वाद असो किंवा नेत्या मंडळींचे कार्यक्रम होत आहेत मग आम्हला का बंदी असा सवाल देखील जाधव यांनी केला आहे. तसेच सर्व ठिकाणावरून आम्हाला पाठिंबा येत आहे. उत्तर भारतातून देखील फोन मला आले. राज ठाकरे यांचा आदेश आहे तो आम्ही पाळणार हिंदू म्हणून आम्ही या लोकांनी मतदान केले आता हेच सरकार मागे फिरले असून हिंदूंच्या सणावर गदा आणत आहे त्याचा आम्ही निषेध करतो. सण होणार दही हंडी करणार, असे अविनाश जाधव यांनी सांगितले आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें