AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 5 August 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 5 August 2021

| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 8:27 AM
Share

सेमीफायनल पराभवानंतरही तिसऱ्या स्थानासाठीचा भारतीय महिलांचा सामना अजून बाकी आहे. ज्या सामन्यातील विजय त्यांना कांस्य पदक मिळवून देईल.

हार कर जितने वाले को बाजीगर केहते हे!’ या प्रसिद्ध सिनेमा डायलॉगला साजेसा खेळ महिला हॉकी संघाने टोक्यो ऑलिम्पकमध्ये केला आहे. सुरुवातीला सलग तीन सामने गमावल्यानंतर एखाद्या घायाळ वाघिनीप्रमाणे भारतीय महिलांनी स्पर्धेत पुनरागमन केलं. ग्रुपस्टेजमधून उपांत्यूपूर्व फेरीत येत त्याठिकाणी ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या प्रतिस्पर्धी संघाला धूळ चारत सेमीफायनल गाठली. त्यानंतर सेमीफायनलमध्येही अगदी तगडी टक्कर दिली पण अवघ्या एका गोलच्या फरकाने भारतीय महिला पराभूत झाल्या. ज्यामुळे सुवर्णपदकाचे त्यांचे स्वप्न तुटले.

सेमीफायनल पराभवानंतरही तिसऱ्या स्थानासाठीचा भारतीय महिलांचा सामना अजून बाकी आहे. ज्या सामन्यातील विजय त्यांना कांस्य पदक मिळवून देईल. या सामन्यासाठी भारतीय महिलांसमोर ग्रेट ब्रिटनचे आव्हान असणार आहे. ग्रेट ब्रिटेनसोबतचा भारतीय महिलांचा सामना 6 ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे.

Published on: Aug 05, 2021 08:27 AM