MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 7 January 2022

संपूर्ण महाराष्ट्रातील कोरोना रुग्णवाढीचा नवा विक्रम नव्या वर्षात नोंदवला आहे. तब्बल 36 हजारपेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण संपूर्ण राज्यात आज आढळून आले आहेत. यातील 20 हजारपेक्षा जास्त रुग्ण तर एकट्या मुंबईत आढळून आले आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील कोरोना रुग्णवाढीचा नवा विक्रम नव्या वर्षात नोंदवला आहे. तब्बल 36 हजारपेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण संपूर्ण राज्यात आज आढळून आले आहेत. यातील 20 हजारपेक्षा जास्त रुग्ण तर एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. दरम्यान, बहुतांश रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळून आलेली नसल्यानं चिंता आणखीनच वाढली आहे. त्यामुळे लक्षण नसलेल्या रुग्णांकडून संसर्ग अधिक होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे.

राज्यात काल कोरोनाचे 36 हजार 265 नवे रुग्ण आढळून आले आहे. दिवसभरात एकूण 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, आजच्या रुग्णवाढीतील सर्वाधिक रुग्णसंख्या ही एकट्या मुंबईत नोंदवली गेली असून मुंबईत तब्बल 201818 नव्या रुग्णांचं निदान करण्यात आलं आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे एकूण 8 हजार 907 रुग्ण कोरोनातून बरे झाले असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI