AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 2 November 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 2 November 2021

| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 4:19 PM
Share

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर ईडीने अटक केलीय. 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात त्यांना ईडीने रात्री 12 वाजता अटक केलीय. गेले अनेक दिवस ते फरार होते. ईडीने अनेक वेळा समन्स दिल्यानंतरही ते ईडी कार्यालयात हजर राहत नव्हते.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर ईडीने अटक केलीय. 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात त्यांना ईडीने रात्री 12 वाजता अटक केलीय. गेले अनेक दिवस ते फरार होते. ईडीने अनेक वेळा समन्स दिल्यानंतरही ते ईडी कार्यालयात हजर राहत नव्हते. परंतु काल सकाळी साडे दहा-अकराच्या सुमारास ते अचानक ईडी कार्यालयात हजर झाले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी 13 तास त्यांची मॅरेथॉन चौकशी केली. अखेर मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास देशमुख यांना अटक करण्यात आली.

चौकशीदरम्यान अनिल देशमुख ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नव्हते. ईडीचे अधिकारी त्यांना विविध विषयांवर बोलतं करण्याच्या प्रयत्न करत होते. मात्र देशमुख काहीतरी लपवू पाहत होते. अनेक प्रयत्नांतरही देशमुख उत्तरं द्यायला, माहिती द्यायला टाळाटाळ करत होते. अखेर रात्री 12 वाजता ईडीने देशमुख यांना अटक करण्याचा निर्णय घेतला.

Follow Us