शिंदे-भाजप सरकार लवकरच कोसळणार… यासह काय आहेत नवीन अपडेट? पहा महाफास्ट न्यूज 100

अस्लम अब्दुल शानेदिवाण, Tv9 मराठी

Updated on: Oct 15, 2022 | 4:54 PM

उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंनी त्यांच्या प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यांनी हातात मशाल घेत आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे.

अंधेरी पोटनिवडणूकीच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे. मात्र आधीच भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे मुरजी पटेल यांच्या उमेदवारी विरोधात उद्धव ठाकरे गट न्यायालयात जाणार आहे. तर अंधेरी पोटनिवडणूकीसाठी प्रचाराची रणधुमाळीही सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंनी त्यांच्या प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यांनी हातात मशाल घेत आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे. तर भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात त्यांचा संपत्ती 10 कोटी 41 लाख दाखवली आहे. यातील 5 कोटी संपत्ती ही वैयक्तिक तर 5 कोटी मुलांच्या नावे दाखवण्यात आली आहे. तर शिंदे-भाजप सरकार लवकरच कोसळणार असे भाकीत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केलं आहे. तर शिंदे गटातील काही आमदार हे नाराज आहेत. जो पर्यंत 145 संख्याबळ आहे. तोपर्यंतच हे सरकार आहे, असेही पवार म्हणाले.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI