विधान भवनात मारहाण केली, जामीन मिळाला अन् आरोपीची मिरवणूक निघाली
विधान भवनात झालेल्या मारहाण प्रकरणी दोन्ही आरोपींना जमीन मंजूर झाला आहे. त्यानंतर आरोपींची मिरवणूक काढण्यात आली.
विधानभवनात झालेल्या मारहाण प्रकरणी दोन्ही आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. नितीन देशमुख आणि सर्जेराव टकलेला मुंबई किल्ला कोर्टाकडून हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन मिळाल्यानंतर सर्जेराव टकले याचं नवी मुंबई येथील कळंबोली येथे जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. आरोपींची अशा प्रकारे मिरवणूक काढण्यात आल्याने आता या आरोपींना नेमकं कोणाचं अभय आहे? असा प्रश्न उपस्थित होतं आहे. तर यावर आता पोलीस काय कारवाई करणार हे पहाणं महत्वाचं ठरेल.
दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे आरोपी मारहाण करताना रंगे हात पकडले गेले आहेत. आमच्याकडे व्हिडीओ आहे. मात्र जेव्हा राज्य व्यवस्थाच गुन्हेगरांना पाठीशी घालते आहे आणि अन्याय झालेल्या नितीन देशमुखला तुझ्यावर गुन्हे लाऊ, मकोका दाखल करू म्हणून धमकावत आहेत, तेव्हा व्यवस्थाच नागडी झाली आहे. त्यामुळे नागड्यांसमोर उघडे नाचत आहेत, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद

