AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra ATS Raid | महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर? थेट पाकिस्तानशी...

Maharashtra ATS Raid | महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर? थेट पाकिस्तानशी…

| Edited By: | Updated on: Jul 10, 2026 | 12:19 PM
Share

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) राज्यभर मोठी कारवाई हाती घेत विविध शहरांमध्ये एकाच वेळी धाडसत्र राबवले आहे. पाकिस्तानस्थित गँगस्टर शेहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियावरील कथित संबंधांच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात येत असून, तपासाला वेग आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा रोड, सांगली, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. सोशल मीडिया नेटवर्कच्या माध्यमातून संशयित व्यक्तींचे संबंध तपासले जात असून, डिजिटल पुरावेही तपासले जात आहेत.

या प्रकरणात १०० हून अधिक जण ATSच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे. संशयितांच्या सोशल मीडिया व्यवहारांची, संपर्कांची आणि इतर डिजिटल माहितीची कसून पडताळणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, पुढील चौकशीत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यभरातील या समन्वित कारवाईमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून, ATSकडून पुढील तपास सुरू आहे.

Published on: Jul 10, 2026 12:19 PM

Follow Us