Maharashtra: 40 मंत्र्यांचा निर्णय घेऊ शकत नाही मग राज्य कसे चालवणार? – सतेज पाटील
चाळीस मंत्यांचा निर्णय घेऊ शकत नाही मग राज्य कसं चालवणार असा सवालही त्यांनी केला. लोकशाहीची व्यवस्था अस्तित्वात न आणणं हे घातक असल्याचेही पाटील म्हणाले. दरम्यान 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी न्यायालयात खटला सुरु आहे.
मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्यावरून सतेज पाटील यांनी टीका केली आहे. अधिकाऱ्यांच्या भरवशावर राज्य चालवणं चिंताजनक असल्याचं सतेज पाटील म्हणाले. चाळीस मंत्यांचा निर्णय घेऊ शकत नाही मग राज्य कसं चालवणार असा सवालही त्यांनी केला. लोकशाहीची व्यवस्था अस्तित्वात न आणणं हे घातक असल्याचेही पाटील म्हणाले. दरम्यान 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी न्यायालयात खटला सुरु आहे. त्याची सुनावणी सोमवारी होणार असून या प्रकरणाच्या निर्णयाची शिंदे आणि भाजप सरकार प्रतीक्षा करत आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे दिसते. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्या सुरु असल्याने मंत्रिपदाच्या याद्या जवळपास निश्चित झाल्याचे काल शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसकर म्हणाले.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
