Maharashtra DCM Swearing-in : महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टारसह 'या' नेत्यांची हजेरी, बघा कोण-कोण उपस्थित?

Maharashtra DCM Swearing-in : महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टारसह ‘या’ नेत्यांची हजेरी, बघा कोण-कोण उपस्थित?

| Updated on: Dec 05, 2024 | 5:38 PM

महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या शपथविधी सोहळ्याला अनेक मंत्री, दिग्गज नेते, बॉलिवूड स्टार देखील आझाद मैदानात दाखल झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. मुंबईतील आझाद मैदानात हा भव्य शपथविधी सोहळा पार पडत आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या शपथविधीसाठी अवघे काही मिनिटे शिल्लक आहेत. या शपथविधी सोहळ्याला अनेक मंत्री, दिग्गज नेते, बॉलिवूड स्टार देखील आझाद मैदानात दाखल झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी अमित शाह, जे.पी.नड्डा, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार शपथविधीच्या ठिकाणी उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी ५.१५ वाजेपर्यंत नरेंद्र मोदी हे आझाद मैदानावर दाखल झालेत. यासोबतच अनेक बॉलिवूड कलाकार शपथविधी सोहळ्यासाठी हजर झाले आहे. या कलाकारांमध्ये अभिनेता सलमान खान, शाहरुख खान, संजय दत्त, रणवीर सिंग हे कलाकार देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीसाठी उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Dec 05, 2024 05:31 PM