Nashik : बाप हा काय प्रकार! 6-7 जणं आले अन् तरूणाला चक्क कारमध्ये कोंबलं, नाशकात भरदिवसा अपहरण
नाशिकच्या सातपूर परिसरात दिवसाढवळ्या एका तरुणाच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. सहा ते सात जणांनी तरुणाला गाडीत कोंबण्याचा प्रयत्न केला, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तरुणाने धाडसीपणा दाखवत पोलिसांचा मदत घेतली आणि सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नाशिकच्या सातपूर परिसरात दिवसाढवळ्या एका तरुणाच्या अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. हा धक्कादायक प्रकार सातपूर परिसरामध्ये घडला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये सहा ते सात जण तरुणाला जबरदस्तीने गाडीत चढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अपहरण करण्यात आलेल्या तरुणाने धैर्य दाखवून पळ काढत पोलीस ठाणे गाठले. या तरूणाने सातपूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे नाशिक शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
Published on: Sep 18, 2025 04:31 PM
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

