यंदा POP चा बाप्पा घेताय? पण विसर्जन करताना ‘ही’ एकच गोष्ट करा, बघा शासनाच्या मार्गदर्शन सूचना?
पीओपी मूर्ती विसर्जन आणि पुनर्वापरासाठी शासनाकडून आता मार्गदर्शक सूचना जारी झाल्यात. बघा काय आहेत या सूचना?
महाराष्ट्र शासनाने पीओपी मूर्तींच्या विसर्जनाबाबत महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचना पर्यावरण संवर्धनावर लक्ष केंद्रित करतात. कृत्रिम टाक्यांमध्ये विसर्जन करणे, गाळाचा पुनर्वापर करणे आणि पर्यावरणपूरक रंगांचा वापर करणे यासारख्या सूचना यात समाविष्ट आहेत. यामुळे गणेशोत्सवातील पर्यावरणीय धोके कमी करण्याचा प्रयत्न आहे. पर्यावरणीय समतोल राखण्यासाठीच महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आलेत. विसर्जनावेळी पर्यावरणपूरक उपाययोजना राबवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे यंदा तुम्ही पीओपीचा बाप्पा घेत असाल तर काही हरकत नाही पण कृत्रिम टाक्यांमध्ये त्याचं विसर्जन करा.
पीओपी मूर्ती विसर्जनासाठी काय मार्गदर्शक सूचना आहेत?
खास व्यवस्था असलेल्या कृत्रिम टाक्यांमध्ये पीओपी मूर्ती विसर्जित कराव्यात.
विसर्जनानंतर तयार होणाऱ्या गाळाचा योग्य पुनर्वापर शक्य.
स्थानिक स्वराज्य संस्थांनी लघू प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची गरज
पीओपी गाळाचा वापर सिमेंट उद्योगातही शक्य आहे यासाठी एसओपी आवश्यक आहे.
मूर्ती सजावटीसाठी केवळ पर्यावरणपूरक रंगांचा वापर करण्याचे निर्देश
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

