Mumbai Mantralay : एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
183 GR Releases : मंत्रालयाकडून एकाच दिवसात हे 183 जीआर प्रसिद्ध करत कोट्यवधी रुपयांच्या निधीचं वाटप करण्यात आलेला आहे.
मंत्रालयात एकाच दिवसात एकूण 183 जीआर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. तसंच कोट्यवधी रुपयांच्या निधीचं वाटप करण्यात आलेलं आहे. मंत्रालयाकडून एकाच दिवसात हे 183 जीआर प्रसिद्ध करत कोटींच्या निधी आणि अनुदान वितरित करण्यात आलं आहे. काल रात्री उशिरापर्यंत मंत्रालायचं कामकाज सुरू होतं. आर्थिक वर्ष संपण्याच्या आत सर्व विभागांना निधीचं वाटप करण्याचं काम सुरू होतं.
यात महावितरण कंपनीला 146 कोटी 80 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. नागपूर हज हाऊसला 1 कोटी 20 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक महामंडळाला भागभांडवल म्हणून 25 कोटी, अल्पसंख्यांक वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या आहारासाठी 15 लाख 89 हजार मंजूर, अल्पसंख्यांक महिला आणि युवकांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी 28 लाख 80 हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. बचत गट योजनेसाठी 3 कोटी 13 लाख रुपये, अल्पसंख्यांक आयोगाला संशोधन प्रशिक्षण योजनेसाठी 2 कोटी, जिल्हा परिषदेला 69 कोटी रुपये, तर आरोग्य योजनेला 10 कोटी रुपये, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेला 10 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

